टॉवरवरील कारवाईची घोषणा पोकळ: पिंपरी: शहरातील मोबाईल टॉवरची रीतसर परवानगी घेऊन ३१ मार्चपूर्वी नोंदणी करावी अन्यथा टॉवर हटविले जातील, असा इशारा महापालिका अधिकार्यांनी संबंधितांना दिला होता. त्यानंतर दोन महिन्यांचा कालावधी उलटला, तरी महापालिकेकडून कारवाई झालेली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
हद्दीतील ४११ पैकी केवळ ३४ मोबाईल टॉवरच्या परवानगीसाठी महापालिकेकडे अर्ज आले आहेत. अनधिकृतपणे टॉवर उभारणार्यांकडून महापालिकेने आतापर्यंत १ लाख ७६ हजार रुपये दंड वसूल केला आहे. महापालिकेने सुचविलेल्या वाढीव अधिमूल्यानुसार वसुली केल्यास २ कोटी रुपये उत्पन्न मिळू शकेल, असा अधिकार्यांचा दावा आहे.
No comments:
Post a Comment