Wednesday, 29 May 2013

सेटटॉप बॉक्स न बसविल्यास गुन्हे

सेटटॉप बॉक्स न बसविल्यास गुन्हे: पुणे : करमणूक कर विभागातर्फे शहरातील केबल नियंत्रण कक्षांची तपासणी करण्यात आली असून काही केबल चालकांनी अद्याप सेटटॉप -बॉक्स बसविण्याची प्रक्रीया पूर्ण केली नाही,अशी माहिती समोर आली. त्यामुळे संबंधित केबल चालकांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश पाटील यांनी सांगितले.

पाटील म्हणाले,ट्राय या संस्थेने दिलेल्या आदेशानुसार पुणे शहरातील टीव्ही संचाना सेट टॉप बॉक्स बसविणे बंधनकारकर आहे. त्याप्रमाणे शहरातील बहुतांश केबल चालकांनी आपल्या ग्राहकांच्या टीव्ही संचांना सेट टॉप बॉक्स बसविले आहेत.

No comments:

Post a Comment