मॉलमध्ये होतेय लूट: - फेडरेशन ऑफ असोसिएशन्सचा आरोप
चिंचवड । दि. १६ (वार्ताहर)
शहरातील व्यापार्यांनी एलबीटी विरोधात बेमुदत बंद पुकारला असल्याने मुख्य बाजारपेठांमधील बहुतांश दुकाने बंद असल्याने दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिकांचे हाल होत आहेत. पोलीस संरक्षणात शहरातील मॉल सुरू ठेवले असले, तरी या मॉलमध्ये जास्त दर घेतले जात असून, नागरिकांची फसवणूक होत आहे. हा काळाबाजार बंद करावा, अशी मागणी फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे.
शहरातील बहुतांश दुकाने बंद असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील २७ मॉल पोलीस संरक्षणात सुरू आहेत. ग्राहक खरेदीसाठी मॉलमध्ये गर्दी करीत आहेत. ग्राहकांची वाढती संख्या विचारात घेता मॉलमध्येही किराणा मालाची विक्री जादा दराने केली जात असल्याचे पत्र फेडरेशनच्या वतीने देण्यात आले आहे. मॉलमध्ये खरेदी केलेल्या अनेक वस्तूंच्या किमती बाजारभावापेक्षा जास्त असल्याचे फेडरेशनने उघड केले आहे. पोलीस संरक्षणात मॉलचा काळाबाजार सुरू असल्याने शासनाने मॉलवर जप्तीचा आदेश काढावा. पिंपरी-चिंचवड विक्रीकर आयुक्तांनी एलबीटी नंबर नसताना विक्री बिले देणे याबाबत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment