आधार नोंदणीचे ६७ टक्के काम पूर्ण: पिंपरी । दि. १६ (प्रतिनिधी)
केंद्र शासनपुरस्कृत आधार योजनेंतर्गत शहरातील आधार नोंदणीचे कार्ड ६७ टक्के पूर्ण झाले आहे. शहरातील १७ लाख २९ हजार ३६९ लोकसंख्येपैकी ११ लाख ५८ हजार ७६२ नागरिकांची आधार नोंदणी झाली आहे.
केंद्र शासनाने निवडलेल्या ३४ शिष्यवृत्ती योजनांचे लाभार्थी, घरगुती गॅसधारकांची आधार नोंदणी प्राधान्याने करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार महापालिकेकडे १0४ मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आचार्य अत्रे सभागृहात स्वतंत्र आधार नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. लाभार्थींनी रहिवासी पुरावा, ओळखपत्र अशी आवश्यक ती कागदपत्र सादर करून आधार नोंदणी करावी, असे सहायक आयुक्त पांडुरंग झुरे यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment