Friday, 17 May 2013

‘राजयोग समजून घेणे आवश्यक’

‘राजयोग समजून घेणे आवश्यक’: पिंपरी । दि. १६ (प्रतिनिधी)

शांतीच्या शोधात गौतम बुद्धांनी महाल सोडला; आणि आम्ही आलिशान घरात शांती शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत. अशावेळी अध्यात्मातील राजयोग समजून घेतला पाहिजे. षड्रिपूयुक्त चंचल मनाला एकाग्र करून ईश्‍वराचे स्मरण करणे म्हणजे राजयोग होय, असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयाचे प्रदेश प्रवक्ते दशरथभाई यांनी केले. पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वयक समिती अंतर्गत जयभवानी तरुण मंडळ आयोजित फुले-शाहू-आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमालेची सुरूवात मोहननगरात झाली. मारुती भापकर यांनी प्रास्ताविक केले. दशरथभाई आणि राजयोगिनी नलिनी दीदी यांनी प्रवृत्तीमध्ये राजयोग’ या विषयावर मत मांडले.

No comments:

Post a Comment