मंगळसूत्र चोरांचा शहरात धुमाकूळ: पिंपरी : मंगळसूत्र हिसकावून नेणार्या चोरट्यांनी शहरात पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. दोनच दिवसांत चोरट्यांनी चार महिलांचे मंगळसूत्र हिसकावले. त्यांच्या हाती तब्बल सव्वा दोन लाखांचा ऐवज लागला आहे. मंगळसूत्र चोरी रोखण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेली नाकाबंदी हा केवळ दिखावूपणा ठरत असून हे गुन्हे रोखण्यात पोलीस सपशेल अपयशी ठरले आहेत.
शुक्रवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास चोरट्यांनी ६0 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची तक्रार प्रतिभा आनंद पालांडे (४५, रा. त्रिमूर्ती संकुल, मोशी प्राधिकरण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात दिली आहे. कुदळवाडीतील गणेश चौकातून त्या पायी चालल्या होत्या. दुचाकीवर येऊन चोरट्यांनी त्यांचे मंगळसूत्र हिसकावून नेले.
No comments:
Post a Comment