Thursday, 23 May 2013

विकास प्रक्रियेस गती देणार

विकास प्रक्रियेस गती देणार: पिंपरी : झपाट्याने वाढणार्‍या या शहराच्या विकासाच्या नियोजनातही गती हवी. अन्यथा ज्या तुलनेत शहर वाढते आहे, त्या तुलनेत सुविधा पुरविणे शक्य होणार नाही. ही बाब प्रकर्षाने लक्षात आली आहे. त्यादृष्टीने कामकाजाच्या कार्यपद्धतीत सुधारणा घडवून आणल्या आहेत. जेएनयूआरएम अंतर्गत प्रकल्पांची अर्धवट कामे पूर्ण केली. नव्या प्रकल्पांची कामे हाती घेतली असून काही प्रकल्पांचे नियोजन केले आहे, असे आयुक्त श्रीकर परदेशी यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेत रूजू होऊन २३ मे रोजी एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आयुक्तांनी वर्षभराच्या कामगिरीचा आढावा घेतला. रूजू झाल्यापासून आयुक्तांनी केवळ अनधिकृत बांधकामे पाडण्याचा सपाटा लावला आहे. विकास कामांकडे दुर्लक्ष केले असून अर्थसंकल्पात तरतुदी केलेला निधीसुद्धा खर्च होऊ शकला नाही. अशा प्रकारचा नगरसेवक, पदाधिकारी यांचा आरोप खोडून काढताना विकास कामांची स्थिती झालेल्या खर्चाची तुलनात्मक आकडेवारी विशद केली.

No comments:

Post a Comment