तुकोबांची पालखी ३0 जूनला शहरात: पिंपरी : शहरात ३0 जूनला दुपारी ४ वाजता जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे तर १ जुलैला सकाळी ८ वाजता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे आगमन होणार आहे. याच्या स्वागतासाठी तसेच महापालिकेच्या वतीने वारकर्यांसाठी देण्यात येणार्या सुविधांसंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर मोहिनी लांडे होत्या.
स्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीस आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासह स्थायी समिती सभापती नवनाथ जगताप, विरोधी पक्षनेते कैलास कदम आदींसह महापालिकेच्या स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा, आरोग्य आणि वैद्यकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment