Friday, 28 June 2013

विकासकामांसाठी २0 कोटी मंजूर

विकासकामांसाठी २0 कोटी मंजूर: पिंपरी : कासारवाडी टप्पा २ मैलाशुद्धिकरण प्रकल्पाच्या देखभाल, दुरुस्तीसाठी येणार्‍या ११ कोटी ७६ लाखांच्या खर्चासह विविध विकासकामांच्या २0 कोटी १0 लाख ९९ हजारांच्या खर्चास स्थायी समिती सभेने मान्यता दिली. अध्यक्षस्थानी नवनाथ जगताप होते.

‘क’ प्रभागातील जलवाहिन्यांवरील नादुरुस्त व्हॉल्व्ह बदलण्यासाठी, वितरण व्यवस्थेची देखभाल दुरुस्तीसाठी २७ लाख ९८ हजारांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. मनपाच्या १८ माध्यमिक विद्यालयातील ९६६१ विद्यार्थ्यांना गणवेश वाटपासाठी येणार्‍या १ कोटी ७१ लाख ९६ हजारांच्या खर्चास मान्यता दिली. उद्यान विभागाकडील रोपे खरेदीसाठी येणार्‍या ४८ लाखांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. औंध-रावेत रस्ता बीआरटी लेन करण्यासाठी ५ कोटी ८५ लाख ६४ हजार रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.

No comments:

Post a Comment