झोपडपट्टीवासीय झालेत शहराचे मालक: - महापालिका सभा : योगेश बहल वदले
पिंपरी : झोपड्या दिवसेंदिवस वाढताहेत. एकीकडे ज्यांनी पैसे खर्च करून जागा घेतल्या, घरे बांधली, त्यांची घरे अनधिकृत म्हणून पाडली जाताहेत. तर झोपडीधारकांना सोई, सुविधा, सवलती दिल्या जातात. फुकटात घरे दिली जातात. ते शहराचे मालक बनलेत आता जावई व्हायचे राहिलेत, अशी टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, नगरसेवक योगेश बहल यांनी प्रश्नोत्तरावेळी केली.
महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यातील ३५ मीटर एचसीएमटीआर रस्त्याच्या क्षेत्रामध्ये ३४५ झोपड्या येत आहेत. ९ वर्षांपासून जागा ताब्यात आहे. पण, विकसित केली नाही. आता अपात्र झोपडीधारकांना बेघर करण्याचे प्रयत्न काहीजण करत आहेत, असा मुद्दा सीमा सावळे यांनी प्रश्नोत्तरावेळी उपस्थित केला. ५0 प्रकल्पांमध्ये आरक्षणाच्या काही क्षेत्रासह १0 लाख चौरस फुटांचे क्षेत्र ताब्यात घेण्यात आले आहे. टीडीआर वाटप झाला आहे. झोपडीधारकांना बेघर करण्याचा काही राजकारण्यांचा डाव आहे. त्यांना बेघर करू नये, अशी मागणी सावळे यांनी सभागृहात केली.
No comments:
Post a Comment