Thursday, 6 June 2013

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त निगडीत ...

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त निगडीत ...:
शिवराज्याभिषेक दिन सर्वांच्या स्मरणात रहावा या हेतूने चिंचवड येथील स्वराज्य ढोल ताशा पथकाच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त गुरुवारी (दि. 6) निगडी येथे ढोल-ताशा वादनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.

निगडी येथील भक्ती-शक्ती शिल्पसमूहासमोरील चौकात सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या पथकात शंभर तरूण-तरूणी ढोल-ताशा वादन करणार आहेत. शिवरायांना मानाचा मुजरा देण्यासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्वराज्य ढोल ताशा पथकाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment