पिंपरी - पिंपरी-चिंचवडमधील अडीचशे कोटी रुपये खर्चाच्या तीन प्रकल्पांचे सादरीकरण महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी मंगळवारी (ता. 17) दिल्लीतील शहर विकास मंत्रालयात केले. यासंदर्भात केंद्राकडून पंधरवड्यात सकारात्मक प्रतिसाद मिळण्याचा आशावाद डॉ. परदेशी यांनी रात्री दिल्लीहून परतल्यानंतर "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. केंद्र सरकारच्या "जेएनएनयूआरएम' अंतर्गत विकासकामांना निधी मिळणार आहे. त्यामुळे त्यांचे सादरीकरण केंद्रीय शहर विकास सचिव सुधीर कृष्णा यांच्यापुढे आयुक्तांनी केले. कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत व मकरंद निकम (पाणीपुरवठा व जलनिस्सारण) उपस्थित होते. शहराच्या 40 टक्के भागाला 24 तास पाणीपुरवठा करण्यासह महापालिकेत नव्याने समावेश झालेल्या ताथवडेच्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनेचे सादरीकरण केल्याचे आयुक्तांनी सांगितले.
No comments:
Post a Comment