Wednesday, 18 December 2013

महिला सक्षमीकरण योजनेत घोटाळा

पिंपरी - महिला सक्षमीकरणाचा मुद्दा मंगळवारच्या (ता. 17) स्थायी समितीच्या बैठकीत गाजला. पालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाने गेल्या सात वर्षांत महिलांच्या सक्षमीकरणासाठी, त्यांच्या प्रशिक्षणासाठी 51 कोटी रुपये खर्चून एकही महिला स्वावलंबी झाली नाही; तसेच या योजनेत मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप आशा शेंडगे यांनी केला. त्यासंदर्भात मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या प्रशासनाचा त्यांनी काही काळ जमिनीवर बसून निषेध केला. 

No comments:

Post a Comment