पिंपरी : दोन महिला सदस्यांनी आक्षेप घेतल्याने गुरुवार, दि. १६ जानेवारीची क प्रभाग समितीची विशेष सभा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला. नियमावर बोट ठेवल्यामुळे सभा रद्दची नामुष्की प्रशासनावर ओढवली.
मकरसंक्रातीची सार्वजनिक सुटी असताना, कर्मचार्यांनी क प्रभाग समिती सदस्यांना घरी जाऊन विशेष सभेचे पत्र दिले. सुटीच्या दिवशी विषयपत्रिकेशिवाय केवळ पत्र देऊन विशेष सभेची माहिती देण्यामागे काहीतरी गौडबंगाल आहे, अशी शंका आल्याने दोन महिला सदस्यांनी याबाबत आक्षेप नोंदवला. नियमबाह्य कामकाज केले जात असल्याचा आरोप करताच, प्रशासनाने विशेष सभा रद्द केल्याचे स्पष्टीकरण दिले.

No comments:
Post a Comment