Friday, 31 January 2014

वायसीएम परिचारिकांचा काळ्या फिती लावून निषेध

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संभाव्य बदलीला शहरातील विविध स्तरांतून जोरदार विरोध सुरू आहे. आतापर्यंत महापालिका प्रशासनातील कोणी पुढे आले नव्हते. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) परिचारिकांनी हे धाडस दाखविले. कामावर असताना काळ्या फिती लावून संभाव्य बदलीचा त्यांनी निषेध नोंदविला, तसेच आयुक्तांच्या प्रशासकीय सुधारणांमुळे आम्हाला सुरक्षितरीत्या काम करता येते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 350 कंत्राटी घंटागाडी कर्मचऱ्यांनीसुद्धा आयुक्तांना पाठिंबा दिला आहे. 

No comments:

Post a Comment