Friday, 31 January 2014

भोसरीत रुग्णांचे हाल

नितीन शिंदे - भोसरी
महापालिकेच्या येथील रुग्णालयात नियोजनाच्या अभावामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. अतिशय अपुरी जागा, अस्वच्छतेमुळे रुग्णांच्या आरोग्यालाच धोका पोहोचत असून, चिमुरड्यांना घेऊन आलेल्या महिलांना भर उन्हात रस्त्यावर रांगेत थांबावे लागत आहे. डॉक्टर, कर्मचारी वर्ग पुरेसा असला, तरी येथील विविध विभागांत अनेक गैरसोई व कमतरता आहेत. त्यामुळे या रुग्णालयाचा इलाज तातडीने करण्याची मागणी होत आहे. 

No comments:

Post a Comment