Tuesday, 25 February 2014

नऊ तासांच्या विक्रमी चर्चेनंतर ...

'बजेट'ची पळवा-पळवी
समान 'बजेट' द्या, समाविष्ट गावांना विशेष पॅकेज द्या, 'बजेट'मध्ये नाविन्याचा अभाव आहे, भांडवली कामांवर खर्च होत नाही, 'लॉक इन' बजेट का नाही, ठराविक नगरसेवक 'बजेट' पळवितात, त्यांच्याच वॉर्डात कामे होतात, अशी ओरड सर्वपक्षीय नगरसेवकांनी  अर्थसंकल्पासाठी आयोजित विशेष महापालिका सभेत आज (सोमवार) केली. शिवसेनेने गणसंख्येचा मुद्दा उपस्थित केल्यावर पळापळ झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने घरी गेलेल्या नगरसेवकांना बोलावून घेतले. या नाट्यमय घडामोडीनंतर तब्बल नऊ तासांच्या विक्रमी चर्चेत आयुक्तांचा मूळ 3400 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. तब्बल 27 उपसूचनांव्दारे 'बजेट'ची पळवा-पळवी करण्यात आल्याने हंगामा होण्याची चिन्हे आहेत.   

No comments:

Post a Comment