Tuesday, 4 February 2014

चोवीस तास राहणार पोलिसांचा खडा पहारा

पिंपरी - शहरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये एक अधिकारी, चार कर्मचारी आणि एक महिला कर्मचारी यांची दोन पथके नव्याने नियुक्त करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिली.

"नागरिकांनी संपर्क साधावा' 
नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पथकामुळे आता पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोवीस तासांत दोन पथकांची गस्त सुरू राहणार आहे. अवैध धंद्यांबाबत नागरिकांना काही माहिती असल्यास 9767992325 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन उपायुक्त शहाजी उमाप यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment