मोकळ्या जागेप्रमाणे छोटे मोठे नालेही कचऱ्याच्या विळख्यात
चाकण – चाकण शहरातील नाल्यांमध्ये टाकण्यात आलेले बांधकाम साहित्य व राडारोड्यामुळे आणि अनेक दिवस कचरा तसाच साचून राहिल्यामुळे नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह बंद झाले आहेत. अस्ताव्यस्त टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यापासून कुठलाही नैसर्गिक घटक वाचू शकलेला नाही. मोकळ्या जागेप्रमाणे आता छोटे मोठे नालेही या कचऱ्याच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे कधीकाळी प्रवाहित असलेले हे नाले आज आपले अस्तित्व हरवून बसले आहेत. चाकण शहरातील काळूस रस्त्यालगतच्या मुस्लिम दफनभूमिच्या समोरील भागात उघड्या नाल्यावर वाढत चाललेला मानव निर्मित कचऱ्याने नैसर्गिक प्रवाह रोखला गेला असून रस्त्या लगतच्या उघड्या नाल्यामुळे अपघातांचा धोका निर्माण झाला आहे.
No comments:
Post a Comment