पिंपरी, (प्रतिनिधी) – टाटा मोटर्स कंपनीच्या व्हीआयपी कॅन्टीनजवळ लागलेली आग एका कामगाराच्या प्रसंगावधानामुळे वेळीच आटोक्यात आली. त्यामुळे मोठी दुघर्टना टळली.
प्रशांत पांडूरंग पिसे असे या कामगाराचे नाव आहे. टाटा मोटर्स कंपनीत पहिली शिफ्ट संपत असतानाच व्हीआयपी कॅन्टीनच्या खालील जीन्यात शॉर्टसर्कीट झाले. त्यातून धूर, वास येत असल्याचे प्रशांत पिसे यांच्या लक्षात आले. आग इतक्या जलद पसरली की, तेथील पंथा पूर्ण वितळून त्याच्यातून पेटलेल्या थेंबाचे ठिपके पडू लागले. ही आग पसरत गेली तर, कंपनीची मोठी जिवित अथवा मालमत्तेची हानी होणार होती.
No comments:
Post a Comment