पिंपरी - पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र आळंदीला दररोज दोन लाख लिटर पाणीपुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून आळंदीकरांना दूषित पाणीपुरवठा केला जातो, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. मात्र, पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून आळंदीसाठी पिण्यासाठी पाणीपुरवठा करावा, यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा केला होता.
No comments:
Post a Comment