Wednesday, 17 May 2017

“पारदर्शक’तेचा बुरखा फाटणार?

– पंतप्रधान, मुख्यमंत्र्याकडे तक्रार: 68 संस्थांचे ठेकेदार धरले वेठीस 
– भ्रष्टाचार मुक्‍त कारभाराला हरताळ
पिंपरी,  (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभागातील रस्ते, गटार साफ सफाई, स्मशानभूमी सुरक्षा रक्षक आणि स्मशानभूमीच्या नवीन कामांच्या विषयांना मुदतवाढ न देता, ते विषय कित्येक दिवस तहकूब ठेवले आहेत. त्या कामाच्या रकमेनुसार 1.50 टक्के “कमिशन’ची मागणी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने केल्याची ठेकेदारांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भ्रष्टाचार मुक्‍त व पारदर्शक कारभाराला हरताळ फासला जात आहे. काही ठेकेदार या पदाधिकाऱ्याविरोधात मुख्यमंत्री व पंतप्रधानांकडे दाद मागणार आहेत.

No comments:

Post a Comment