पिंपरी - ‘‘महापालिकेने नऊ वर्षांपूर्वी व त्यानंतर जागतिक बॅंकेकडून विविध विकासकामांसाठी घेतलेल्या १५० कोटी रुपये कर्जावर दरवर्षी ३० ते ४० टक्के वार्षिक व्याज द्यावे लागत आहे. भारतीय बॅंकांचा व्याजदर सध्या वार्षिक सात ते १४ टक्क्यांपर्यंत आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता जागतिक बॅंकेला १५० कोटी रुपये परत करणे सहज शक्य आहे. ती रक्कम जागतिक बॅंकेला तातडीने देऊन शहरातील करदात्यांची कर्जातून मुक्तता करावी,’’ अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे शुक्रवारी केली.
No comments:
Post a Comment