Saturday, 3 June 2017

मध्यरात्रीच्या मॅरेथॉन बैठकीनंतर शेतकऱ्यांचा संप मागे

मुंबई – गेले दोन दिवस राज्यातील शेतकरी संपाने वातावरण ढवळून निघत असताना जागे झालेल्या सरकारने शेतकरी प्रतिनीधींशी शुक्रवारी रात्री केलेली चर्चा फळाला आली. यामुळे शेतकऱ्यांनी संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री आणि शेतकरी संघटनेचे नेते यांच्यात तब्बल 4 तास बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी व शेतीमालाला हमीभाव या प्रमुख मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यानंतर शनिवारी पहाटे शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी संप मागे घेत असल्याचे जाहीर केले. मात्र, नाशिकमधील शेतकऱ्यांनी हा निर्णय अमान्य असल्याचे सांगत संप सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे. यामुळे शनिवारी सकाळीदेखील नाशिकच्या बाजार समितीमधील शेतीमालाचा आणि दुधाचा व्यापार बंदच आहे.

No comments:

Post a Comment