Saturday, 3 June 2017

[Video] कचरा व्यवस्थापनासाठी पिंपरी महापालिका सरसावली; पाच जूनपासून कचरा विलगीकरणाची मोहीम


एमपीसी न्यूज - स्वच्छ भारत अभियानात 'कचरा' झालेली पिंपरी-चिंचवड महापालिका आता कचरामुक्त शहर करण्यासाठी सरसावली आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पाच जूनपासून घनकचरा विलगीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती, महापौर नितीन काळजे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, सह आयुक्त दिलीप गावडे, आरोग्य अधिकारी मिनीनाथ दंडवते आदी उपस्थित होते. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पाच जूनपासून पिंपरी-चिंचवड शहरात घनकचरा विलगीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी शहरातील विविध सामाजिक संस्था मदत करणार आहेत. कचरा मुक्त प्रभाग करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून याची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात सोसायट्या आणि व्यावसायिक बाजारपेठा कचरा मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे, आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment