पिंपरी - चिंचवड येथील समरसता पुनरुत्थान गुरुकुलम या संस्थेतर्फे वंचित समाजातील ३२९ विद्यार्थ्यांना निवासी शाळेत शिक्षण दिले जाते. विनाअनुदानित असलेल्या या संस्थेला आजपर्यंत अनेक मान्यवरांनी, राष्ट्रीय नेत्यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुकही केले आहे; मात्र सध्या ही संस्था आर्थिक अडचणीत सापडली आहे. वीजबिल न भरल्याने येथील विद्यार्थी १५ दिवस अंधारात होते. आजही लाखो रुपयांचे वीजबिल, मिळकतकर आणि शिक्षकांचे पगार थकले आहेत.
No comments:
Post a Comment