Saturday, 23 September 2017

[Video] खड्डे बुजविण्यासाठी पिंपरी पालिका वापरणार 'जेट' पॅचर यंत्रणा

पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्डयामुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. पालिका आता शहरातील खड्डे बुजविण्यासाठी 'जेट' पॅचर पोथॉल मशिनचा अवलंब करणार आहे. या आधुनिक मशिनद्वारे खड्डे बुजविण्यास शुक्रवारी नाशिक फाटा येथून सुरुवात करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांशी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मान्सूनपूर्व डागडुजी करण्यात न आल्याने उद्योगनरीच्या रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. खड्डे बुजविताना पालिकेकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने अवलंब केला जात नाही. त्यामुळे खड्ड्यांची समस्या दिवसें-दिवस उग्र बनत आहे. खड्ड्यांच्या वाढत्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने खड्डे बुजविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निश्चित केले आहे

No comments:

Post a Comment