पिंपरी - उपग्रहाद्वारे छायाचित्रे काढून वृक्षगणना करण्याचा प्रस्ताव वृक्षविभागाने तयार केला आहे. तो मान्यतेसाठी महापालिका आयुक्तांकडे सादर केल्याची माहिती उद्यान अधीक्षक सुरेश साळुंखे यांनी सकाळला दिली. अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग करण्यात येणार असून, त्यासाठी सहा कोटी 80 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पाच वर्षांपूर्वी शहरातील झाडांची वृक्षगणना मानवी पद्धतीने झाली होती, त्या वेळेस 18 लाख झाडे होती. सध्या झाडांची संख्या 25 लाखांपर्यंत जाऊन पोचल्याचे साळुंखे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment