एकनाथ पवार ; आम्हाला खरेदीत रस नाही. शहरातील गोरगरिबांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे
वायसीएम रुग्णालयातील वैद्यकीयअधिकारी, कर्मचार्यांच्या रिक्तपदाअभावी दैनंदिन रुग्णसेवेचा पुरता बोजवारा उडाल्याने तसेच डॉक्टर, परिचारकांची कमतरता, औषधांचा तुटवडा, पायाभूत सुविधांची कमतरता या मुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) आजारी पडले असल्याचे दिसून येत आहे. रुग्णालयातील गंभीर समस्या पुन्हा एखदा उजेड्यात आल्या आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पत्रकारांसह शुक्रवारी (दि. १) महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाची तीन तास पाहणी केली. तेथील समस्या जाणून घेण्यासोबतच त्यांनी रुग्णांशी संवाद साधला. त्याचप्रमाणे रुग्णालयातील समस्यांवरून प्रशासनाला धारेवरही धरले. शहराची ओळख असलेले वायसीएम रुग्णालय सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. सत्तारूढ पक्षनेते यांनी रुग्णालयातील अनागोंधी कारभाराबाबत त्यांनी प्रशासनाची कानउघाडणी केली.
No comments:
Post a Comment