पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दोन्ही स्थायी समित्यांनी वेळेत ३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला, तर दोन्ही शहरांतील प्रवाशांसाठी पीएमपीच्या ताफ्यात २०० बस दाखल होण्यास महिनाअखेरीस सुरवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात ६७ बस तयार झाल्या आहेत. प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पार पडली, तर पंधरा दिवसांनंतर या बस मार्गांवर धावू शकतील.

No comments:
Post a Comment