पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मागील 1992-93 आर्थिक वर्षांपासून “ऑडीट’ करण्यात आलेले नाही. मोठ्या प्रकल्पांचे “रेकॉर्ड’ पालिकेतील विभाग प्रमुखांनी गहाळ केले आहे. “रेकॉर्ड’ उपलब्ध न झाल्याने महापालिकेचे कित्येक वर्षांचे “ऑडीट’ रखडलेले आहे. याबाबतचा अहवाल लेखापरीक्षण विभागाने आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सादर केला. त्याची गंभीर दखल घेत आयुक्तांनी विभाग प्रमुखांसह 47 अधिकाऱ्यांना नोटीस बजावून खुलासा मागितला आहे. त्यासाठी त्यांना सात दिवसाची मुदत देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment