Sunday, 29 October 2017

महापालिकेने तुकाराम सृष्टी साकारण्याची मागणी

पिंपरी – महापालिकेने संत तुकारामनगरमध्ये तुकाराम सृष्टी उभारावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर यांनी महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराच्या लगत देहू व आळंदी असे दोन मोठे तीर्थक्षेत्र आहेत. पिंपरीतील संत तुकारामनगरमध्ये संत तुकाराम महाराजांचे सुंदर मंदिर आहे. त्यामुळे या परिसराला संत तुकारामनगर हे नाव पडलेले आहे. या मंदिरापासून जवळच असलेल्या एच.ए. कंपनीच्या मैदानावर संत तुकाराम महाराजाच्या पालखीचा मुक्काम व रिंगण सोहळा झाला आहे. वारीतील वारकऱ्यांचा संत तुकारामनगरमध्ये मुक्काम असतो.

No comments:

Post a Comment