Monday, 30 October 2017

बांधकाम परवानगीतून मेट्रोची सुटका

पिंपरी – मेट्रो रेल्वेचे काम जलद गतीने करण्यासाठी परवानगीच्या जाचातून मेट्रो रेल्वेला मुक्त करण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत. यापुढे मेट्रो रेल्वेला बांधकामासाठी पिंपरी – चिंचवड महापालिका, पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्याही परवानगीची आवश्‍यक लागणार नाही. तशी सुधारणाच कायद्यात करण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रो रेल्वेला किती बांधकाम आणि कशाप्रकारे बांधकाम करता येईल, यावर कुणाचे नियंत्रण असेल, असा सवाल उपस्थित होत आहे.

No comments:

Post a Comment