जगताप डेअरी येथे सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मात्र, या कामामुळे सकाळी व सायंकाळी वर्दळीच्या वेळी मोठी वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सांगवी वाहतूक पोलिसांनी सकाळी साडे सात ते साडेअकरा व सायंकाळी चार ते साडेनऊ या वर्दळीच्या वेळी जड वाहनांना बंदी करण्यात आली आहे.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या निवेदनानुसार, काळेवाडी फाटा ते जगताप डेअरी व कस्पटे वस्ती ते जगताप डेअरी या दोन मार्गावरून बस, खासगी बस, ट्रक व इतर जड वाहनांना सकाळी सात ते साडेअकरा व सायंकाळी चार ते साडेनऊ या कालावधीत प्रवेश बंद असणार आहे. ही बंदी जगताप डेअरी चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत कायम राहणार आहे. यामध्ये शासकीय बस, रुग्णवाहिका व अग्निशामकदल अशा अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment