पिंपरी – अवैध बांधकाम नियमीतकरण्याची प्रक्रिया पिंपरी – चिंचवड महापालिकेने सुरु केली आहे. नागरिकांचे अर्ज स्वीकारण्यासाठी महापालिका मुख्यालयात कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. अर्जाचा नमुना तयार करण्यात आला असून अटी – शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत. नियमावलीचे जाहीर प्रकटीकरण केले जाणार आहे. दोन दिवसात अर्जाचा नमुना महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. अवैध बांधकाम नियमीतकरण प्रक्रियेबाबत नगरसेवकांनाही माहिती देण्यात येणार आहे.नागरिकांच्या सोयीसाठी मराठीतून माहितीपुस्तिका काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले
No comments:
Post a Comment