निगडी, प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आणि वसुंधरा क्लब पुणे यांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे ११ ते १३ नोव्हेंबर दरम्यान किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात पर्यावरण विषयक विविध लघुपट, अनुबोधपट प्रदर्शित केले जाणार आहेत. यंदाच्या महोत्सवाचे मुख्य उद्दि्ष्ट ‘नदी वाचवा-जीवन वाचवा’ राहणार आहे. तसेच जल दिंडीचे प्रणेते डॉ. विश्वास येवले यांना यंदाचा ‘वसुंधरा’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे कार्याध्यक्ष विनोद बन्सल यांनी दिली.
No comments:
Post a Comment