स्मार्ट सिटी संचालकपदी नियुक्त झालेल्या मनसे आणि शिवसेनेच्या संचालकांना निर्णयप्रक्रियेतून सत्ताधारी भाजपने एकप्रकारे डिच्चू दिला आहे. प्रकल्पाला गती देण्यासाठी स्थानिक संचालकांची सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली, परंतु त्यात मनसेचे सचिन चिखले व शिवसेनेच्या प्रमोद कुटे यांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे सत्ताधा-यांच्या कुरघोडीमुळे स्मार्ट सिटीला वादाचे ग्रहण कायम असून पुन्हा एकदा राजकीय संघर्ष सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
No comments:
Post a Comment