- असुरक्षितता व खड्ड्यानी अपघातांत वाढ
- जड वाहनांचा प्रवेश बंदी कागदवरच
- वाहतूक कोंडी, धुळीने नागरीक त्रस्त
देहुरोड, (वार्ताहर) – राज्य रस्ते विकास महामंडळाने गतवर्षी पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरील निगडी ते देहुरोड रस्त्याचे चौपदरीकरण सुरू केले. वाहतुकीची सुरक्षितता आणि खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती, जड वाहनांकडे ठेकेदारांचे दुर्लक्ष होत असल्याने अपघात वाढले आहेत. कि. मी. 20.400 ते कि. मी. 26.540 दरम्यानच्या 6.140 कि. मी. रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम मुंबईतील पी.बी.ए. इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला देण्यात आले आहे. त्यासाठी 39 कोटी 6 लाख 13 हजार 892 रुपये खर्चाची तरतूद केली आहे.
No comments:
Post a Comment