Tuesday, 5 December 2017

महापालिकेला 22 कोटींचा भुर्दंड?

सराफ व्यावसायिकांचे “चांगभले’ : आयात मालाची जकात पाण्यात
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात आयात केलेल्या सोने, चांदी व अन्य मौल्यवान धातुवर महापालिका जकात आकारणी करत होती. त्यानुसार सोने, चांदी या मालाचा व्यवसाय करणाऱ्या 44 व्यावसायिकांना सन 2008-09 आणि 2009-10 आर्थिक वर्षांसाठी आयात केलेल्या मालावर दोन टक्‍के प्रमाणे जकात व दहा पट तडजोड शुल्क भरण्याची नोटीस बजाविण्यात आली. परंतु, नोटीस दिल्यानंतरही व्यावसायिकांनी जकात व तडजोड फी रक्कम भरलेली नाही. त्यामुळे सन 2011-12 आर्थिक वर्षांतील लेखापरीक्षणात जकात व तडजोड शुल्कापोटी सुमारे 22 कोटी रुपयांच्या वसुलीवर पाणी सोडावे लागले आहे. महापालिकेच्या लेखापरीक्षणातून महापालिका अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणाचा भांडाफोड झाला आहे.

No comments:

Post a Comment