पिंपरी (Pclive7.com):- पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिकफाटा ते चांडोली(खेड) रस्ता सहापदरीकरण या २९.९३ कि.मी. लांबीच्या १०१३.७८ कोटी रकमेच्या कामास मान्यता मिळाली आहे. या कामाची निविदा प्रक्रिया येत्या दिड महिन्यात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून पूर्ण करण्यात येणार असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. सहापदरीकरण करण्यास मान्यता दिल्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि भाजप सरकारचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आभार मानले आहेत.
No comments:
Post a Comment