पिंपरी – चिंचवड येथील हॉटेल सुरुची ते चापेकर चौक रस्ता अवघ्या चार महिन्यात खराब झाल्याने स्थापत्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने महापालिकेचे सुमारे सव्वा कोटीचे नुकसान झाले. कोणतेही प्लॅन, इस्टीमेट न करता, अंदाजपत्रकात तरतूद नसतानाही 62 लाखांचा जादा खर्च केल्याचा ठपका ठेवत स्थापत्य कनिष्ठ अभियंता राजेंद्र वसंतराव राणे यांना एक वेतनवाढ स्थगिती करण्याची कारवाई महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केली.
No comments:
Post a Comment