पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराचे कारभारी म्हणून पालकमंत्री गिरीश बापट हे महापालिकेच्या कामकाजात लक्ष घालू लागले आहेत. पालिकेच्या शिक्षण समितीत पक्षाच्या सक्रीय कार्यकर्त्यांना सामावून घेण्यासाठी स्विकृत सदस्य संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यामुळेच शिक्षण समिती स्थापनेचा विधी समितीने उपसूचनेसह मंजूर केलेला विषय सर्वसाधारण सभेत तहकूब ठेवण्यात आला. पुण्याच्या धर्तीवर शिक्षण समिती स्थापना करुन कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
No comments:
Post a Comment