Thursday, 7 December 2017

शहरात उभारणार किड्‌स सिटी

  • महिला व बालकल्याण समितीचा निर्णय ः चिमुकल्यांच्या शहरासाठी प्रस्तावास मंजूरी
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू आहे. अहमदाबादच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडमध्ये देखील किड्‌स सिटी साकारण्याचा निर्णय महिला व बालकल्याण समितीने मंगळवारी झालेल्या बैठकीत घेतला. शहरातील लहान व शालेय मुलांना विविध क्षेत्रांतील ज्ञान साध्या-सोप्या भाषेत अवगत व्हावे, याकरिता किड्‌स सिटी उभारण्यात येणार आहे. महापालिकेच्या स्थायी सभागृहात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महिला व बालकल्याण समिती सभापती सुनिता तापकीर होत्या.

No comments:

Post a Comment