पिंपरी – शहरातील अनधिकृत बांधकामावरील कारवाईसह अतिक्रमण नियंत्रण व निर्मुलनासाठी पोलीस बंदोबस्त महापालिकेला अत्यावश्यक आहे. अनेकदा अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी पोलीस खात्याकडून मिळणाऱ्या बंदोबस्तावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने एक विशेष पोलीस ठाणे आणि चार प्रभागात चार पोलीस चौकी निर्माण करावी, असा प्रस्ताव महापालिकेने नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे मान्यतेसाठी पाठवला होता; परंतू सदरील प्रस्तावास अद्याप शासनाची मान्यता न मिळाल्याने तो लाल फितीत अडकला आहे.
No comments:
Post a Comment