बांधकाम पूर्णत्व दाखले वितरणात वाढ : 1,690 इमारतींना परवानगी
पिंपरी – बिल्डरांना रेरा कायद्यांतर्गत जुन्या व नव्या प्रकल्पांची नोंदणी करण्याचे शासनाने आदेश दिले होते. त्यानुसार नोंदणी झालेल्या यापुर्वीच्या 235 बांधकामांना पुर्णत्वाचे दाखले दिले आहेत. तसेच गेल्या अकरा महिन्यात शहरात तब्बल 1 हजार 690 नवीन बांधकामांना परवानगी दिल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने चालू आर्थिक वर्षांत 369 कोटी महसुलाच्या ठेवलेल्या उद्दिष्टापैकी 289 कोटी रुपये पालिका तिजोरीत जमा झाले आहेत. उर्वरीत शिल्लक 80 कोटी रुपयांचे उद्दिष्ट पुर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती बांधकाम विभागाचे सह शहर अभियंता आयुबखान पठाण यांनी दिली.
No comments:
Post a Comment