Tuesday, 9 January 2018

भाटनगर प्रकल्पाचे “स्ट्रक्‍चरल ऑडीट’ कागदावरच

पिंपरी – भाटनगर पुनर्वसन प्रकल्पाला 27 वर्ष पूर्ण झाल्याने इमारतींना अक्षरशः तडे गेले आहेत. सर्वच इमारतींचे बांधकाम जीर्ण झाल्याने भींतीचा व छताचा काही भाग खाली कोसळत आहे. त्यामुळे अपत्ती घडण्याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी या पुनर्वसन प्रकल्पातील 17 इमारतींचे “स्ट्रक्‍चरल ऑडीट’ करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला. याला दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी हा निर्णय कागदावरच लटकला आहे. प्रत्यक्षात “स्ट्रक्‍चरल ऑडीट’ला सुरूवात केली नसल्यामुळे प्रशासन दुर्घटना घडण्याची वाट पाहते की काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

No comments:

Post a Comment