Saturday, 13 January 2018

परवाना विभागाचा कारभार पुन्हा कडुसकरांकडे

पिंपरी – अनधिकृत फ्लेक्‍समुळे शहराचे विद्रुपीकरण होत असताना कारवाईची बोळवण करणाऱ्या आकाश चिन्ह परवाना विभागाचे तत्कालीन सहायक आयुक्त योगेश कडूसकर यांनी स्थायी समितीच्या सलग चार बैठकांना दांडी मारल्याने त्यांची बदली करण्यात आली होती. मात्र, त्यांचा कारभार दिलेल्या अधिकाऱ्यांनाही कामकाजात अडथळे येवू लागल्याने यांना पुन्हा परवाना विभागाचे कामकाज पाहण्याचे आदेश देण्याची नामुष्की ओढावली आहे.

No comments:

Post a Comment