पिंपरी – इंद्रायणी नदीपात्रातील पाण्यात जलचर प्राणी मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती समजताच महापौर नितीन काळजे यांनी पर्यावरण विभागाच्या सहायक आयुक्तांसह मोशी येथील बंधाऱ्यावर जाऊन गुरूवारी (दि. 11) प्रत्यक्ष पाहणी केली. नदीपात्रालगत कंपन्यांमधून केमिकल मिश्रीत पाणी नदीपात्रात सोडले जात असल्यामुळे मासे व जलचर मृत्युमुखी पडत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तातडीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाशी संपर्क साधून याबाबत आढावा घेण्यासाठी सतर्क राहण्याचे आदेश पर्यावरण विभागाला दिले.
No comments:
Post a Comment