पिंपरी – रस्ते विकासासाठी साडेचारशे कोटींच्या निविदा प्रसिध्द केल्या असताना संबंधित ठेकेदाराला कामाचे आदेश देताना वृक्ष प्राधिकरण समितीच्या उपसमितीकडून अडवणूक केली जाते. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची कामे करण्यासाठी अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. संबंधित उपसमिती आणि प्रशासन यांच्यात अंदाधुंद कारभार सुरू आहे. कोणत्याच प्रकारचे सहकार्य केले जात नसल्याचा आरोप करीत स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
No comments:
Post a Comment