काळेवाडी – लहान-लहान झोपड्यांमध्ये राहणारी लहान-लहान मुले आर्थिक अडचणींमुळे शिक्षणासोबतच कित्येक अत्यावश्यक बाबींपासून वंचित राहतात. आई-वडील दोघेही मोल-मजुरी करत असल्याने त्यांच्याकडे लक्ष देणारे कुणीही नसते. वाढलेल्या केस आणि नखे याबाबतही कुणी सांगणारे नसते. थोडे मोठे झाले की ते देखील पैसे कमावण्याच्या मागे धावू लागतात आणि जीवनातील कित्येक आवश्यक असणाऱ्या बाबी मागे सुटतात. अगदी लहानशा वाटणाऱ्या या बाबी आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जनसेवा फाऊंडेशनने सुरू केली आहे मायेची शाळा.
No comments:
Post a Comment